पनवेल परिसरात आढळला मृतदेह

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहर परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. अनोळखी इसमाचे अंदाजे वय 25 ते 30 वर्षे, अंगाने सडपातळ, डोक्याचे व दाढीचे काळे व वाढलेले, अंगात काळ्या रंगाचा टी-शर्ट व उजव्या हातावर इतर भाषेतील तीन अक्षरे गोंदलेली आहेत. या इसमाबाबत अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे 022-27452333 किंवा सपोनि प्रकाश पवार यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version