| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल परिसरात सोमवारी (दि. 12) एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. इसमाचे अंदाजे वय 55 ते 60 वर्षे, रंग सावळा, उंची 6 फुट 2 इंच, बांधा सडपातळ, डोक्याचे व दाढीचे केस पांढरे व वाढलेले आहेत. तसेच उजव्या गुडघ्यावर जखम झालेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 27452333 किंवा सहा.पो.निरीक्षक प्रकाश पवार यांच्याशी संपर्क साधावा.