पनवेल परिसरात आढळला मृतदेह

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरात एका 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. संजय जशराज पांडे (35) असे या इसमाचे नाव असून रंग गोरा, अंगाने सडपातळ, केस काळे तसेच दाढी मिशी काळी वाढलेली असून, अंगात लाल रंगाचा फुल बाह्याचा टी-शर्ट व ग्रे रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी क्र.27452333 किंवा पो.उपनि.उद्धव सोळंके यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version