पनवेल परिसरात आढळला मृतदेह

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल शहर परिसरात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल पोलीस करत आहेत. या व्यक्तीचे अंदाजे वय 55 ते 60 वर्षीय, रंग सावळा, उंची 5 फूट 5 इंच, चेहरा उभट, अंगाने मजबूत, डोक्याचे केस काळे – पांढरे, दाढी मिशीचे केस पांढरे वाढलेले, डाव्या हाताच्या कोपराजवळ जुनाट जखमा असून अंगात काळसर रंगाची फुल पॅन्ट व निळ्या रंगाचा हाफ बाह्याचा टी-शर्ट व पायात निळ्या रंगाचे शुज घातलेले आहेत. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version