| पनवेल | प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील वहाळ गावाजवळील खाडीत एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. उलवा पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे. या व्यक्तीचे अंदाजे वय 30 वर्षे असून उंची अंदाजे 165 सेंमी, बांधा मध्यम, चेहरा गोल, केस काळे वाढलेले, राखाडी रंगाचा फूल बाह्यांचा बटनाचा शर्ट, काळ्या रंगाची ट्रॅकपॅंट, उजव्या हातावर ‘माऊली’ असे मराठीमध्ये गोंदलेले तसेच धागा व ताबीज बांधलेले, डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ गोंदलेले आहे. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास उलवा पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरिक्षक शिवाजी पोफळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वहाळ खाडीमध्ये आढळला मृतदेह
