। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावपासून 5 किमी अंतरावर असणार्या मोर्बा गावच्या हद्दीत एका 38 ते 42 वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत बुधवारी (दि.18) सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माणगावजवळील मोर्बा गावच्या हद्दीत अज्ञात पुरुष जातीचा 38 ते 42 वयोगटातील इसमाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. सदर इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास माणगाव पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.02140-263005 यावर किंवा तापसिक अधिकारी पोलीस उपनिरीक्षकगायकवाड मो.नं.9307351289 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.