। ठाणे । प्रतिनिधी ।
भिवंडी येथे बुधवारी (दि. 18) एका पडीक इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेतील मृत मुलगा भिवंडी येथील अन्सार नगर परिसरात कुटुंबियांसह राहत होता. हा मुलगा मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होता. या प्रकरणाची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर शांतीनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता तो परिसरातील एका पडीक इमारतीच्या पाण्याच्या टाकीजवळ खेळताना दिसला. पोलिसांनी जाऊन पहिले असता पाण्याच्या टाकीत मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.