कर्जतमध्ये रंगली शरीर सौष्ठव स्पर्धा

150 महिला, पुरुष स्पर्धकांचा सहभाग

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत येथे शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. रायगड, ठाणे, पुणे, मुंबई या चार जिल्ह्यातील 150 महिला आणि पुरुष शरीर सौष्ठवपटुांचा सहभाग असलेल्या स्पर्धेला कर्जत करांनी उदंड प्रतिसाद दिला. सौ माधवीताई नरेश जोशी फाऊंडेशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उदय देवरे हा भावी खासदार श्री ठरला असून त्याने एक लाखाचे बक्षीस पटकावले.



राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मावळ लोकसभा मतदारसंघ निरीक्षक माधवी नरेश जोशी यांच्या माध्यमातून कर्जत येथे महिला आणि पुरुष गटासाठी शरीर सौष्ठव स्पर्धा भरवण्यात आली होती. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन सलग्न बॉडी बिल्डर्स ॲण्ड फिटनेस असोसिएशन रायगड यांनी या स्पर्धेचे संयोजक म्हणून काम पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा मतदारसंघ निरीक्षक माधवी जोशी आणि राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेश जोशी यांच्या संकल्पनेतून आणि वीर फिटनेस सेंटर यांच्या माध्यमातून भावी खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रशांत पाटील, सुरेश टोकरे, अतुल पाटील, दीपिका भांडारकर, बाळू फडके, संतोष चौधरी, वंदना मोरे, शंकर भुसारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या शरीर सौष्ठव स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात एकूण 150 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या खुल्या गटात अनिकेत पाटील आणि महिलांमध्ये गौरी वरणकर या विजेत्या ठरल्या.

Exit mobile version