| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेतील उरण येथील राष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू प्रतिक प्रविण दर्णे याची निवड तर्फे थायलंड पटाया येथे होणाऱ्या जागतिक बॉडीबिल्डिंग स्पर्धा मि.आशिया व मि.वर्ल्ड करिता भारतीय संघात झाली आहे. सदर स्पर्धा दिनांक 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर रोजी पट्टाया थायलंड येथे संपन्न होणार आहेत. या आधी प्रतिक याने रायगड श्री , द्रोणगिरी श्री, महाराष्ट्र कुमार हे किताब नावावर केले असून आता त्याचे पुढील लक्ष जागतिक पातळी वर उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आहे.
उरण येथील एक छोट्या खेड्यातील हा स्पर्धक तालुका, जिल्हा, राष्ट्र यानंतर आज जागतिक पातळीवर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. याचे सगळे श्रेय तो रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेबरोबर तसेच संतोष साखरे, जितेंद्र गुरव, ट्रेरेन्स फर्नांडिस, नंदकिशोर शिंदे यांना देत आहे. रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना ही महाराष्ट्र हौशी शरीर संस्था संघटना तसेच अमॅच्युअर बॉडी बिल्डिंग फेडरेशन बरोबर संलग्न आहे. ह्या संघटनांतर्फे अनेक जिल्हा पातळी तसेच राष्ट्र पातळीवर शरीर सौष्ठव स्पर्धा घेतल्या जातात व त्यामधून दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शरीर सौष्ठवपटूंची निवड केली जाते.





