| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यातून अटक केलेल्या दहशतवादी झुल्फिकारबडोदावाला याला 11 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. झुल्फिकार अनेकांना बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देत होता. झुल्फिकार बडोदावाला हा पुण्यातील दिवेघाटात बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देत होता.
कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून झुल्फिकार याला अटक करण्यात आली होती. दरम्यान एटीएसने केलेल्या चौकशीत धक्कादाय माहिती समोर आली आहे. झुल्फिकार दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवत होता. तसेच त्याचा दोन्ही दहशतवाद्यांशी संपर्क एटीएसने केलेल्या तपासातून स्पष्ट झाले आहे.