अलाहाबाद विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये बॉम्ब बनवताना स्फोट; विद्यार्थी जखमी

| अलाहाबाद |वृत्तसंस्था |

अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणारा एक विद्यार्थी आपल्या खोलीत बॉम्ब बनवत असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी झालेल्या स्फोटात दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. मुख्य आरोपीची प्रकृती गंभीर आहे. संबंधित घटना बुधवारी सायंकाळी घडली. अलाहाबाद विद्यापीठात शिक्षण घेणारा एक विद्यार्थी वसतिगृहाच्या खोलीत कथितपणे बॉम्ब बनवत होता. यावेळी त्याच्या हातात स्फोट झाल्याने तो गंभीर जखमी झाला, असं पोलिसांनी सांगितलं. संबंधित विद्यार्थी हा बॉम्ब का बनवत होता? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप कळू शकली नाही. प्रभात यादव असं आरोपी विद्यार्थ्याचं नाव असून तो अलाहाबाद विद्यापीठात एमएचं शिक्षण घेत आहे. स्फोट झाला आणि त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली, अशी माहिती शिवकुटीचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश कुमार यादव यांनी दिली.

Exit mobile version