किल्ले रायगडावर शिवसमाधीसमोर पुस्तक पूजनाचा प्रकार उजेडात; पुण्याचे दोघे ताब्यात

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
किल्ले रायगडवर धक्कादायक असा प्रकार घडला आहे. शिवसमाधीसमोर राख आणून पुस्तक पूजन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. महाड तालुका पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी शिवसमाधीसमोर पुस्तक पूजन सुरु असल्याचे गडावरील शिवप्रेमींना दिसून आले आहे.

यानंतर जेव्हा अधिक माहिती घेतली असता त्यांच्याकडे डब्यात राख असल्याचेही देखील दिसले आहे. त्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी राख आणि पुस्तक जप्त केल्याचे समोर आले आहे. शिवसमाधीसमोर पुस्तक पुजनाच्या या प्रकारानंतर राख आणि पुस्तक पोलिसांनी जप्त केले आहे.
डब्यातील राखेची लॅबमध्ये चाचणी केली जाणार असल्याची माहिती समजत आहे. दरम्यान, दोघांची नावे समजू शकलेली नाहीत. तसेच नेमके पुस्तक कोणते आणि ते काय करत होते याची माहिती आणखी समोर आली नाही. या प्रकरणाची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन सदर अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

Exit mobile version