| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे खासदार निधीतून साकारलेल्या नूतन ग्रामपंचायत वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते शनिवारी (5 मार्च) संपन्न झाला. तटकरे यांच्या खासदार फंडातून पंचवीस लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला होता. बोर्लीपंचतनच्या सरपंच ज्योती परकर यांनी सुनील तटकरे यांच्याकडे गावाची पाण्याची समस्या तसेच गेली अनेक वर्षे बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळण्याची प्रलंबित असलेली मागणी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.
यावेळी उपसरपंच नंदकिशोर भाटकर, जि.प. सदस्या सायली तोंडलेकर, सदस्य/सदस्या, गटविकास अधिकारी उद्धव होळकर, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, वैद्यकीय अधिकारी सूरज तडवी, सा.बां. विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक दिनेश रहाटे, महंमद मेमन, दर्शन विचारे, लालाभाई जोशी, दिवेआगर सरपंच उदय बापट, मंदार तोडणकर, सुकुमार तोंडलेकर, नंदकुमार पाटील, स्वाती पाटील, इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या या नूतन वास्तूमध्ये आपली समस्या घेऊन येणारी व्यक्ती ही जाताना त्या समस्येचे समाधान घेऊनच बाहेर पडेल असा कारभार या कार्यालयातून होईल.
खा. सुनील तटकरे