। मुरुड-जंजिरा । प्रतिनिधी ।
बॅकिंग क्षेत्रातील आर्थिक व्यवहार हे नियमाने चालत असतात. पतसंस्था यादेखिल आर्थिक व्यवहार करताना सहकार कायद्याचे अधिन राहूनच ठेवीच्या प्रमाणात कर्ज वितरित करीत असतात. ठेवीदारांच्या ठेवीतून गरजु व्यक्तीला कर्ज दिले जाते. त्यामुळे कर्जदाराने देखिल आर्थिक शिस्त पाळून वेळच्या वेळी कर्ज रक्कम भरली पाहिजे, असे प्रतिपादन एनकेजीएस बँकेचे डेप्युटी मॅनेजर अतिश म्हात्रे यांनी केले आहे.
जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरुड तर्फे नांदगाव शाखेच्या 22व्या वर्धापन दिनी माळी समाज सभागृहात आयोजित सभासद मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी श्रीराम पंतसंस्थेचे चेअरमन दिलीप जोशी, व्हा. चेअरमन मेघराज जाधव, सचिव सुनिल विरकुड, कोषाध्यक्ष बाळकृण कासार, संचालक गणेश ठोसर, सरव्यवस्थापक संजय ठाकूर, सरपंच शेजल घुमकर, नांदगाव शाखा समिती सदस्य पांडुरंग निरकर, उदय रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.