। पनवेल । वार्ताहर ।
लोकलची धडक लागून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाती घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस मृतांच्या वारसांचा शोध घेत आहेत. पहिल्या घटनेत कोपरखैराणे ते तुर्भे रेल्वे स्टेशनदरम्यान कि.मी.नं. 45/30 जवळ लोकल गाडीची धडक लागून एका 55 वर्षीय अज्ञात हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला आहे. मृताची उंची 5 फुट 6 इंच, रंग- निमगोरा चेहरा उभट, नाक सरळ, डोकीचे केस पांढरे टक्कल पडलेले आहे व अंगात निळसर रंगाचा त्यावर मारून रंगाचे पट्टे असलेला फुल शर्ट व नेसणीस काळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे. पोलिस उपनिरीक्षक ए.सी.आढाव हे तपासी अंमलदार आहेत. दुसर्या अपघाती घटनेत मानखुर्द ते वाशी रेल्वे स्टेशन कि.मी.नं.22/06 जवळ लोकलची धडक लागून एका 50 वर्षीय अज्ञात हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला आहे. उंची 5 फुट 3 इंच, अंगाने मध्यम, रंगाने काळासावळा, चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे, दाढी साधारण बारीक, मिशी तलवार कट असे त्याचे वर्णन असून, त्याने अंगात हिरवे राखाडी पांढर्या रंगाचे जर्किन, आत पिवळसर रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व नेसणीस काळे रंगाची ट्रक पॅन्ट असा पोशाख परिधान केला आहे. तपासी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक एस.ए. शेटे हे आहेत. दरम्यान, या दोन्ही अपघाती घटनेतील मृतांच्या वारसांबाबत कोणाला माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.2227812696 किंवा पोलिस हवालदार श्रीकृष्ण वेदपाठक 9870157850 यांच्याशी संपर्क साधावा.