। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील दत्ता इन हॉटेल समोर रस्त्याने चालत जात असताना रिक्षाने दिलेल्या धडकेत दोघे जण जखमी झाले आहेत. रिक्षा क्रमांक एम एच 46 बीपी 1610 वरील चालक गणेश तुकाराम राठोड (रा. वावेघर) याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिसर मोरी येथील मोहम्मद मुकीन मोहम्मद रशिद हा त्याचा नातेवाईक सगीर अहमद हे दोघे दहिसर मोरी येथून पनवेल बस स्थानकावर उतरले. रोह्याला जाण्यासाठी ते दत्त इन हॉटेल समोरून रस्त्याने पायी चालत जात असताना एम एच 46 बीपी 1610 वरील चालक गणेश राठोड याने त्यांना धडक दिली. या धडकेत रशीद याच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. तर सगीर याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.