अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम

प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी अलिबाग नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक कचरा नियंत्रणासाठी बॉटल बीन उभारण्यात आले आहे. गो ग्रीन नर्सरी प्रा.लि माध्यमातून ही भेट देण्यात आली असून, या त्याचा शुभारंभ शनिवारी (दि.18) करण्यात आला. यावेळी वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, अनिल चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते.

प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाढत्या प्लास्टिकच्या समस्येला रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अलिबाग समुद्र किनारी बॉटल बीन बसवण्यात आली आहे. या बीनची प्लास्टिक मुक्तीसाठी मदत होणार आहे. या सुविधेचा जास्त जास्त वापर करून स्वच्छतेसाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले.

ग्रो ग्रीन या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून समुद्र किनारी प्लास्टिक बॉटल संकलनसाठी बॉटल बीन नगरपरिषदेला भेट देण्यात आली. ही बॉटल बीन समुद्र किनारी बसवण्यात आली आहे.

Exit mobile version