| तळा | वार्ताहर |
तळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तळा प्रीमियर लीग 2022 (पर्व 4 थे) ही स्पर्धा दिनांक 18 ते 20 फेब्रुवारी रोजी बोरघर क्रीडा संकुल मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेमध्ये सोहम सुपरकिंग – संघ मालक चंद्रकांत रोडे, विनायक मुंढे, एकविरा स्पोर्ट भाई फायटर्स – संघमालक प्रदीप (बाबू) फुलारे, व्ही. एम्.कॅपिटल्स- संघमालक- विनायक (भाई) महाडकर, मोहम्मद अली बाणकोटकर, संदिप वॉरीयर्स-संघ मालक-रितेश मुंढे, किशोर मोरे, सर्फराज गोठेकर, खाचे कार्लेकर रायडर्स- संघ मालक- इर्शाद खाचे, निलेश कार्लेकर, पद्मदुर्ग फायटर्स- संघ मालक-प्रचित मसाल, एस.ऐ.वॉरीयर्स- संघ मालक- शैलेश घोलप, अविनाश शिंदे, ए. पी.चायलेजर्स- संघमालक- अविनाश पिसाळ, प्रमोद काप असे 8 संघ सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेकरिता खेळाडू लिलाव कार्यक्रम हॉटेल आसावरी येथे पार पडला यावेळी क्रिकेट या खेळासाठी नेहमी सहकार्य करणारे व या स्पर्धेचे मागील पर्वाचे संघमालक संदिप मोरे, सुप्रभात कुंडे व बाळशेठ लोखंडे यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ही स्पर्धा तळा तालुका मर्यादित असून या स्पर्धेत एकूण 119 खेळाडूंनी आपले नोंदणी अर्ज भरले होते एका संघात 14 खेळाडू याप्रमाणे 112 खेळाडूंचा लिलाव यावेळी करण्यात आला. या स्पर्धेत विजेता व उपविजेता संघास देण्यात येणार्या चषकाच अनावरण नमित पांढरकामे यांचे हते करण्यात आले. यावेळी सर्व संघाचे संघमालक, संघव्यवस्थापक,कर्णधार, खेळाडू उपस्थित होते.या स्पर्धेचे नियोजन तळा प्रीमियर लीग 2022 कमिटी सदस्य मोहित (बाबू) मोरे, कैलास पायगुडे, विनायक मुंढे, सुधीर तळकर, निलेश कार्लेकर, निखिल तळकर, सौद तीसेकर, प्रणव मेकडे यांनी केले आहे.तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन किल्ला रोहा येथील हर्षल मुंढे आणि कमिटी सदस्य निलेश पांढरकामे यांनी केले.