केरळमध्ये निपाहने मुलाचा मृत्यू

| मल्लपुरम | वृत्तसंस्था |

केरळमधील मलप्पुरम येथील निपाह व्हायरसने ग्रस्त 14 वर्षीय मुलाचा रविवारी मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, पीडित मुलाला सकाळी 10.50 वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवरही ठेवण्यात आले, मात्र सकाळी 11.30 वाजता त्याचा मृत्यू झाला.

वीणा जॉर्ज यांनीसांगितले की, संक्रमित मुलाला ऑस्ट्रेलियातून मोनोक्लोनल अँटीबॉडीज देण्यात आल्या होत्या. प्रोटोकॉलनुसार, संसर्ग झाल्यानंतर 5 दिवसांच्या आत दिले जाते. या प्रकरणात, बाधित मुलाला अँटीबॉडीज देण्यास विलंब झाला. मुलाचे अंत्यसंस्कार आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार केले जातील, असेही वीणांनी सांगितले. यासाठी मुलाचे कुटुंबीय आणि पालकांशी बोलणी सुरू आहेत. त्याचवेळी त्याच्या संपर्कात आलेल्या तीन नातेवाईकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये 2018 पासून पाचव्यांदा निपाह संसर्ग पसरला आहे. यापूर्वी 2019, 2021 आणि 2023 मध्येही त्याची प्रकरणे आढळून आली आहेत. यासाठी अद्याप कोणतीही लस तयार केलेली नाही.

Exit mobile version