उल्हास नदीत बुडून मुलाचा मृत्यू

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीमध्ये शेलू येथे एक 11 वर्षीय मुलगा पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला आहे. या मुलाच्या मृत्यूबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अनाथाश्रमाच्या चार कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

रविवारी (दि.9) सायंकाळी सुनीता अशोक रामगिरी मुलांना उल्हास नदीवर पोहण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. मात्र, त्याआधी त्या सर्व मुलांच्या पालकांची त्याबाबत कोणतीही परवानगी घेतली नव्हती. 11 वर्षीय दीपक गोपाळ सिंग मित्रांसह वाहत्या पाण्यात पोहताना अपघात घडला. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दहातोंडे हे करीत आहेत. त्या ठिकाणी अपघात झाला त्यावेळी संस्थचे कामगार केतन सोनी तसेच शीतल, नितीन, प्रियांका या तेथे बसून होत्या, पण पाण्यात उतरल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version