मतपेटीतून भ्रष्टाच्याऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्धार
| पाली | वार्ताहर |
रासळ ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान न करण्याचा तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे. प्रशासनाने याप्रकरणी कारवाई करण्याचे मान्य केल्याने ग्रामस्थांनी एक पाऊल मागे घेतले आहे. निवडणुकीत जे भ्रष्ट उमेदवार उभे असतील त्यांना मतपेटीतून धडा शिकवण्याचा निर्धार मात्र ग्रामस्थांनी केला आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी दिली. या प्रसंगी सागर मोरे, महेश सितापराव, मंगेश म्हसके, उमेश म्हसके, प्रकाश देशमुख, प्रवीण खाडे, रोहिदास खाडे, योगेश दळवी, केतन म्हसके, कदम, मोहन खाडे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.