| पनवेल | प्रतिनिधी |
सोन्याच्या दुकानातून शेहेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे लहान बाळाच्या हातातील कडे बुरखा घातलेल्या महिलेने चोरून नेले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात 1 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पनवेल शहरातील मलाबार गोल्ड अँड डायमंड रिचेस ज्वेलर्स आर्केड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेली महिला लहान बाळाच्या हातातील सोन्याचे कडे घेण्यासाठी आली होती. यावेळी सेल्समनने तिच्यासमोर कड्यांचा ट्रे ठेवला. यावेळी त्यातून पसंतीचे कडे शोधत असताना हातचलाखी करून 4.7 ग्राम वजनाचे सोन्याचे कडे हातात लपवून ती बुरख्याच्या खिशात घालून चोरी करून निघून गेली. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आला आहे.







