। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिका हद्दीत पावसाळ्यात तोडलेल्या झाडांच्या फांद्या नवीन पनवेल सेक्टर 5, 8, 9 10 परिसरातील फुटपाथवरच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या झाडांच्या फांद्या लवकरात लवकर उचलाव्यात अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
तोडलेल्या झाडांच्या फांद्या अनेक ठिकाणी फुटपाथवरच टाकून देण्यात आल्याने पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. येथील फुटपाथ तोडलेल्या फांद्यांनी अडवल्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असून, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पनवेल महापालिकेकडून किंवा संबंधित ठेकेदारामार्फत झाडांची छाटणी केल्यानंतर फांद्या तात्काळ उचलून नेणे अपेक्षित असते. मात्र, अनेक ठिकाणी दिवसेंदिवस या फांद्या फुटपाथवरच पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर फांद्यांचे मोठे ढिगारे झाल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग व्यक्तींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे फुटपाथवरील फांद्या तातडीने हटवून फुटपाथ मोकळे करण्याची मागणी केली आहे.
तोडलेल्या झाडांच्या फांद्या फुटपाथवरच
