ब्रेव्हो अंजू वर्ल्ड एथलेटिक्सकडून वुमन ऑफ द इयरने सन्मानित

। दिल्ली । वृत्तसंस्था ।
वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्सने भारताची अथलीट अंजू बॉबी जॉर्जचा वुमन ऑफ द इयरने गौरव केला आहे. भारतातील खेळाच्या प्रगतीसाठी केलेल्या तिच्या प्रयत्नांसाठी आणि तिच्यासारखंच इतर मुलींना खेळण्यासाठी प्रेरणा दिल्याने तिची या पुरस्कारासाठी निवड केली गेली. वर्च्युअल पद्धतीने झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तिचा गौरव करण्यात आला.
अंजु बॉबी जॉर्ज ही भारताची लांब उडी क्रीडा प्रकारातील स्टार खेळाडू आहे. 2016 मध्ये तिने मुलींसाठी प्रशिक्षण अकॅडमी सुरु केली. त्याआधी तिने वर्ल्ड ण20 मध्ये पदक विजेत्यांनाही घडवलं आहे. यासाठी तिने आवश्यक ती मदत खेळाडूंना केली आहे. तसंच भारताच्या अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनची उपाध्यक्ष म्हणूनही तिने काम पाहिले. यामाध्यमातून तिने लैंगिक समानतेसाठी सातत्यानं आवाज उठवला. शालेय विद्यार्थीनींना अ‍ॅथलेटिक्समध्ये येण्यासाठी अंजुने मार्गदर्शन केलं आहे. तिच्या या कामाची दखल घेत वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्सने अंजुचा वुमन ऑफ द इयर पुरस्काराने गौरव केला.
वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स अवॉर्ड 2021 पुरस्कार सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात ऑलिम्पिक चॅम्पियन इलेन थॉम्पसन आणि कर्स्टन वॉरहोम यांचा वर्ल्ड अ‍ॅथलीट्स ऑफ द इयर पुरस्काराने गौरव करण्यात आला.

Exit mobile version