। मुंबई । वार्ताहर ।
राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाकडून छापे टाकण्यात आले आहेत. तर, अनिल परब यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनिल परब यांचे लेखा परिक्षक (सीए) यांच्या घरीही ईडीने धाड टाकली आहे.
अनिल परब यांच्या सीएच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. त्या चौकशीतून ईडीला नेमकं काय अपेक्षित आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. याआधी अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनिल परब यांचे सीए आधी आयकर विभागाच्या रडारवर होते. आता ईडीकडून झाडाझडती सुरु झाली आहे.
दरम्यान, ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांची चौकशी झाली होती. तसंच, अनिल परब यांच्यासोबत त्यांच्या सीएवरही गुन्हा दाखल होणार का? हे पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणात त्याचीही चौकशी होणार असल्याची चर्चा आहे.