सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात

। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होत आहे. त्याचवेळी बंडखोर एकनाथ शिंदे गटही बैठका घेत आहे. मात्र, सरकार वाचविण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील योजनांवर चर्चा होणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही बोलावली आहे. सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. त्यांनी खास प्लान तयार केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे पक्ष वाचवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरु आहेत.

शरद पवार यांनी महत्त्वाची बैठक बोलावली
महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेची सध्याची सर्वात मोठी कसरत सरकार वाचवण्याची नसून पक्ष वाचवण्याची आहे. त्यामुळे त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही या राजकीय युद्धात सरकारचे सारथी होताना दिसत आहेत. पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

शिवसेना आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होऊ शकते
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व नेते, उपनेते, संपर्क अधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सध्याच्या राजकारणासोबतच शिवसेना आणि मुख्यमंत्रीपदाचा महत्त्वाचा निर्णय यावर चर्चा होणार आहे.

Exit mobile version