। मुंबई । प्रतिनिधी ।
ठाकरे सरकार कोसळल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज संध्याकाळी ७ वाजता शिंदे-फडणवीसांचा शपथविधी होणार असून ठाकरे सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. याचा अंतिम निकाल लागला असून एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे.