उरण,वार्ताहर
गुन्ह्यातील पुरावा मजबूत न करण्यासाठी उरण तालुक्यातील मोरा सागरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सागर संजय पवार(29) यांना 10 हजाराची लाच स्वीकारताना नवी मुबंई लाचलुचपत खात्याच्या पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण यांनी रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची तक्रारदारांनी पोलीस उपनिरीक्षकाची तक्रार नवी मुबंई लाचलुचपत खात्याकडे 14 मार्च 2022 रोजी केली. या तक्रारीच्या आधारे अँटी करप्शन ठाणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो नवी मुबंई पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण यांनी सापळा रचत मोरा येथील साईबाबा मंदिर रस्ता या ठिकाणी उपनिरीक्षक सागर पवार यांनी त्यांच्या ताब्यातील होंडा सिटी गाडी नंबर एम एच 43 एक्स 4521 या गाडीत बसून तक्रारदाराकडून 10 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पुढील तपास लाचलुचपत खाते करीत आहे.