। माणगाव । प्रतिनिधी ।
चोरीच्या गुन्ह्यामध्ये मदत करून बाहेर काढण्यासाठी लाच मागणार्या माणगाव पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाईक कुंजन जाधव यांना मंगळवारी (दि.9) माणगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,तक्रारदार यांच्या विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तक्रारदाराने महिला पोलीस नाईक कुंजन जाधव यांस सहकार्य करण्यास सांगितले होते. त्यांना सहकार्य करण्यासाठी जाधव यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली होती.
तडजोडीअंती 90 हजार रुपये लाचेची रक्कम घेण्याचे मान्य केले.याबाबत तक्रारदार यांनी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला. तसेच लाचखोर पोलीस महिलेला ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाध्यक्ष सुषमा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अरुण करकरे, विनोद जाधव, महेश पाटील, पोलीस नाईक जितेंद्र पाटील, सचिन आटपाडकर यांच्या पथकाने केली.