लाचखोर महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात

| महाड | प्रतिनिधी |
वारस नोंद करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या महिला तलाठीला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.7) दुपारी एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड तालुक्यातील तळोशी गावाच्या हद्दीतील सर्व्हे नंबर 23/4, 24/13, 25/1, 31/5, 47/14, 32/4, 25/18 व नांदगाव खुर्द येथील सर्व्हे नंबर 182, 197, 80 या वडिलोपार्जित शेत जमिनीमध्ये वारस नोंद करण्याकरता तलाठी शिल्पा पवार यांनी 6 हजाराची मागणी केली. याबाबत शरद दत्ताराम चव्हाण (रा. नालासोपारा) यांनी लाचलुचप प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवार दुपारी 12:40 वाजता सापळा रचून ही कारवाई केली.

Exit mobile version