ढगाळ वातावरणामुळे वीटभट्टी मालक धास्तावले

| सुकेळी | वार्ताहर |

मागील चार ते पाच दिवसांपासून आभाळात आलेल्या ढगाळ वातावरणामुळे वीटभट्टी मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन अवकाळी पावसामुळे वीटभट्टीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर का अवकाळी पाऊस कोसळला तर कच्च्या विटांवर पावसाचे पाणी पडल्यामुळे त्या विटांची माती होऊन मोठे नुकसान होण्याच्या भीतीने सारेच वीटभट्टी मालक धास्तावले आहेत.

सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वत्र वीटभट्टीचे काम जोरात सुरु आहे. अनेक ठिकाणी वीटभट्टी रचण्यात आल्या असून त्या वीटा भाजायच्या बाकी आहेत. पंरतु काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असुन गेले चार ते पाच दिवस सकाळपासूनच ढगाळ वातावरण पसरल्यामुळे वीटभट्टी मालकांमध्ये घबराट पसरली आहे. अनेक वीटभट्यांवर वीट रचलेली आहे जर का कच्च्या विटांवर पावसाचे पाणी पडल्यास पुर्णतः त्या वीटांची माती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही ठिकाणी तयार झालेल्या वीटांची भट्टी रचण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशावेळी अचानक अवकाळी पावसाची रिमझिम सुरू झाल्यास वीटभट्टीचे मोठे नुकसान होण्याच्या भीतीने सर्वच वीटभट्टी मालकांच्या मनामध्ये धडधड निर्माण झाली आहे.

Exit mobile version