दि. बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन बिनविरोध निवड

। मुंबई । प्रतिनिधी ।
दि. बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणूकीत संदीप घनदाट, यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये दत्ताराम चाळके, किशोर रांगणेकर, गणेश महाले, विठ्ठल चिबिलकर, दिलीप चव्हाण, संतोष केळकर, अरुण दळवी, चंद्रकुमार सिंग, सुभाष देशमुख, विलियम सिक्वेरा, अनु. जाती/ जमा. अमोल शेडगे, इतर मागासवर्गीय भरत मोरे, भटक्या विमुक्त जाती / जमाती महावीर बनगर तर महिला प्रतिनिधी अनुश्री माळगावकर व मंगल नाखवा यांची बिनविरोध निवड झाली. दि. बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन नेहमीच आपल्या सभासद बँकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि सुरळीत कामकाजासाठी तसेच आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन सुनिश्‍चित करुन त्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन देते. संदीप घनदाट हे अग्रगण्य सहकारी अभ्युदय बँकेचे अध्यक्ष आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालक मंडळावर देखील आहेत. त्यांचे सहकारक्षेत्रातील उत्तम ज्ञान बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशनसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरेल.

Exit mobile version