ब्रिजभूषण सिंहांच्या अडचणीत वाढ

अल्पवयीन महिला कुस्तीपटूचा नोंदवला जबाब

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

लैंगिक छळ केल्याच्या आरोपाने वेढलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढ झाली आहे. अल्पवयीन महिला कुस्तीपटूने दिलेल्या जबाबात धक्कादाक माहिती दिली आहे. पोलीस आता अन्य कुस्तीपटूंचे देखील जबाब नोंदवणार आहेत. एनआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अल्पवयीन महिला कुस्तीपटूने फेडरेशनच्या प्रमुख आणि भाजपचे खासदार यांच्यावरील लैंगिक छळाशी संबंधित आरोपांविषयी आपला जबाब नोंदवला आहे. सीआरपीसीच्या कलम 164 अन्वये महिला कुस्तीपटूचे जबाब नोंदवला. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर यापूर्वीच दोन एफआयर दाखले केले होते. दरम्यान, या प्रकरणात खटला चालवला जाणार आहे. पोलीस पीडितांचे जबाब नोंदवून घेणार आहेत. त्यामुळे ब्रिजभूषण यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. अल्पवयीन महिला कुस्तीपटूंशी लैंगिक छळ केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. यात पॉक्सो कायद्यांतर्गतदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसर्‍या एफआयआर लैंगिक छळाच्या आरोपाखाली दाखल केले गेले आहे.

ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी विनेश फोगाट, साक्षी मलिका आणि बजरंग पोनिया यांच्यासह देशातील अनेक कुस्तीपटू गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. या कुस्तीपटूंनाही शेतकर्‍यांकडून पाठिंबा मिळत आहे. याव्यतिरिक्त अनेक राजकीय पक्षांनी जंतर-मंतर भेट देऊन कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शविला आहे.

Exit mobile version