भवानी नडगांव क्रिकेट संघाची चमकदार कामगिरी

अष्टपैलू खेळाडू विवेक किजबिले ठरला मालिकावीर

| मुंबई | सुजित धाडवे |


ग्रामीण भागातील क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू मोठ्या प्रमाणात मुंबई सारख्या शहरात राहत असून दसऱ्या नंतर बहुतांश क्रिकेट संघ मुंबईत क्रिकेट स्पर्धा आयोजित करतात. महाड तालुक्यातील श्री.मानाई देवी ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ आणि गावदेवी क्रिकेट संघ सव यांच्यावतीने खारघर येथे एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये 32 नामांकित क्रिकेट संघामध्ये भवानी नडगांव क्रिकेट संघ अ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर अष्टपैलू खेळाडू विवेक किजबिले याने मालिकावीर पुरस्कार पटकावला.

यादरम्यान महाड तालुका क्रिकेट असोसिएशन मर्यादित अंतर्गत असणाऱ्या या हंगामी वर्षाची प्रथमच नियोजित स्पर्धा असल्याने 32 संघानी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत कुडूक चॅलेंजर संघ उपविजेतेपद, आशीर्वाद क्रिकेट संघ तुडील तृतीय तर श्री भैरी जोगेश्वरी वामने ब चतुर्थ क्रमांकांचे मानकरी ठरले. उत्कृष्ट फलंदाज अक्षय अगबुल, उत्कृष्ट गोलंदाज सुमित आंबेकर, उत्कृष्ट सिक्सर किंग म्हणून जय बैकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मनिष पवार तर मालिकावीर विवेक किजबिले हा खेळाडू ठरला. विजेत्या संघाला आणि खेळाडूंना सन्मानचिन्ह व पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Exit mobile version