| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान राणी म्हणजे नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आता नवीन कोचेस बनवून घावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जनादर्न पार्टे यांनी केली आहे. मिनीट्रेनमधून प्रवास करण्यासाठी पर्यटकांची वाढती मागणी असून, ते लक्षात घेऊन मिनीट्रेनचे कोचेस नव्या दर्जाचे आणि आकर्षक असावेत, अशी मागणी करणारे निवेदन जनार्धन पार्टे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांना पत्र देऊन केले आहे.
मिनीट्रेनसाठी प्रथम दर्जाचे 24 सीटर आठ नवीन कोचेस मागविण्यात यावेत, अशी मागणी जनार्दन पार्टे यांनी केली आहे. त्याचवेळी द्वितिय श्रेणीमधील 30 प्रवासी क्षमता असलेले 30 कोचेस आणि द्वितीय श्रेणी सर्वसाधारण दर्जा याचे आठ कोचेस तसेच लगेज आणि एसएलआर असे एकत्र असलेले सहा नवीन डब्बे मागविण्यात यावेत, अशी त्यांनी मागणी केली आहे. तर, मालवाहू डब्यांचीदेखील नव्याने बांधणी करण्यात यावी आणि त्यात बंदिस्त तसेच कॉमन असे 20 डब्बे नव्याने मागविले जावेत, अशा मागणीचे निवेदन जनार्दन पार्टे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्याचवेळी 21 किलोमीटर लांबीच्या मार्गावर दुरुस्तीची किरकोळ कामे केली जातात, त्यावेळी त्या त्या ठिकाणी रेल्वे कामगार यांना पिण्याच्या पाण्याची व्यस्था करणारी पाणी वाहू गाडी सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.