ताट वाजवून संपूर्ण देशात औदसा आणली -नाना पटोले

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भाजपचे लोक अत्याचार करतात आणि महाविकास आघाडीला वेठीस धरतात. थाळ्या आणि टाळ्या वाजवल्या की, अवकळा आणि औदसा येते असे म्हणतात. तसं यांनी संपूर्ण देशात ताट वाजून औदसा आणली आहे, अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर केली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीदरम्यान आयोजित जाहीर सभेत नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशात महागाई बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून, भारतीय जनता पार्टीचे सरकार कामगार कष्टकरी शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करण्यासाठी एक प्रकारची हुकूमशाही निर्माण करत आहे. धनदांडग्यांच्या फायद्यासाठी काळे कायदे भाजप सरकारने लागू केले असून, लवकरच हे सरकार बरखास्त करावे लागेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचार सभेत बोलताना दिला. देशात मोठ्या प्रमाणात महागाई, बेरोजगारी वाढली असून पेट्रोल-डिझेलचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत. काँग्रेस जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचा विचार करून सर्वसामान्यांच्या आणि लोकहिताचे निर्णय घेत आहे. मात्र, देशात वेगवेगळ्या समस्या उद्भवून भारतीय जनता पार्टी मूळ प्रश्‍नांना बगल देत आहे. काँग्रेस पक्षात सर्वसामान्यांना घेऊन चालणारा पक्ष असून, लोकशाही व्यवस्थेचे पालन करून झोपलेल्या सरकारला जागे करण्याचे काम करत आहे, असेही मत नाना पटोले यांनी केले.

Exit mobile version