दामोदर हुले यांना कांस्यपदक

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
भारतीय बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने मिस्टर इंडिया 2022 चे आयोजन बालेवाडी पुणे येथे नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेत 556 किलो गटात दामोदल हुले यांनी कांस्यपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत 55किलो, 60किलो, 65किलो, 70किलो, 75 किलो, 80किलो, 85किलो, 90किलो, 95किलो, 100 किलो गटातील भारतातील विविध राज्यातील बॉडी बिल्डर्सना खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द मधील 55 किलो गटात दामोदर हुले या बॉडी बिल्डर्सने केले होते. या स्पर्धेत दामोदर हुले यांनी 55 किलो गटात कांस्य पदकाला गवसणी घातली. जिम ट्रेनर सचिन बुरटे आणि अभिषेक कदम यांनी खूप मेहनत घेऊन या स्पर्धेसाठी तयार केले. या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर्सने सहभाग नोंदवला होता. प्रत्येक गटातील विजेत्यांना मेडल, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version