| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर यांच्या मार्फत लातूर येथे झालेल्या 21 ते 24 डिसेंबर दरम्यान राज्य स्तरीय तायक्वांदो क्रीडा निवड चाचणी क्रीडा स्पर्धेत पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 11 वी कला शाखेत शिकणारा ओम प्रमोद डेंगळे याने 59 किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळ दाखवत ब्राँझ मेडल प्राप्त केले.
ओम प्रमोद डेंगळे तसेच क्रीडा शिक्षक तेजेश म्हात्रे यांचे संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वॉर्ड, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील, उप प्राचार्य निशिकांत कोळसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
पीएनपीच्या ओम डेंगळेला कांस्य
