| मुंबई | प्रतिनिधी |
एका 13 वर्षांच्या मुलाने आपल्या 5 वर्षांच्या मामेबहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजक घटना नालासोपारातील परिसरात घडली आहे. कुटुंबातील प्रत्येकजण आपल्या मामेबहिणीचे लाड करत असल्यामुळे भावाने आपल्या बहिणीची हत्या केली आहे. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान हे नालासोपारा पूर्व येथील श्रीराम नगर येथे राहतात. त्यांना 2 मुली आहेत. त्यांची बहीण त्यांच्या घरासमोरच राहते. कामावरून येताना त्याने आपल्या लहान मुलीला शाळेतून आणले. सायंकाळी खेळायला गेली. परंतु, ती पुन्हा घरी परतलीच नाही. चिमुकली घरी न परतल्यामुळे तिचा शोध घेण्यात येत होता. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये खान यांचा मुलगा चिमुकलीला घेऊन जात असल्याचे निर्दशनास आले. मुलाकडे चौकशी केली असता, एका अज्ञात व्यक्तीने चिमुकलीला मारल्याचे सांगितले.
घाबरलेल्या कुटुंबाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मुलीचा तपास केला असता, मुलीचा मृतदेह श्रीराम टेकडीवर आढळला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मुलाची चौकशी केली. सुरूवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नंतर त्याने गुन्हा कबुल केला. कुटुंबातील प्रत्येक जण आपल्या बहिणीचे लाड करतात. याच रागातून त्याने तिला संपवलं. अल्पवयीन मुलाने दिलेल्या माहितीनुसार, हत्येपूर्वी त्याने रमन राघवन 2 हा चित्रपट पाहिला होता. त्याने आधी मामे बहिणीला डोंगरावर नेलं नंतर गळा आवळून हत्या केली, नंतर दगडानं चेहरा ठेचला. या प्रकरणी मुलाला ताब्यात घेतले असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भावानेच घेतला चिमुकल्या बहिणीचा जीव
