मुंबईत तरुणाची भर रस्त्यात निर्घृण हत्या

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईच्या गोवंडीत धक्कादायक घटना घडली आली आहे. गोवंडीत एका अठरा वर्षाच्या तरुणाची भर रस्त्यात निर्घृण हत्या झाल्याली आहे. मोहम्मद सईद पठाण असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मोहम्मद सईद पठाण हा गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहतो. त्या हत्या प्रकरणातील आरोपी देखील याच परिसरात राहतात. सर्व जण एकमेकांच्या परिचयाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद सुरु होते. मोहम्मद हा शिवाजीनगर परिसरातून जात होता. त्यावेळी 3 अल्पवयीन मुलांनी त्याला गाठले. त्यांनी जुने भांडण उकरून काढले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मोहम्मदवर हल्ला केला. या हल्ल्यात मोहम्मद रस्त्यावरच कोसळला. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या मोहम्मदला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोहम्मदच्या मृत्यूनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस आता मुख्य आरोपीच्या शोधात आहे. या हत्येच्या घटनेने शिवाजीनगर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version