। अलिबाग । प्रतिनिधी ।
नवर्याने रागाच्या भरात पत्नीची निघृण हत्या केली. कुर्हाडीने वार करून तिचा खून केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील वळवली आदिवासी वाडीत मंगळवारी घडली. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजा नाईक ( वय 50 वर्षे) असे या आरोपीचे नाव असून मंदा राजा नाईक असे मयत महिलेचे नाव आहे. दोघेही पती पत्नी असून त्यांच्यामध्ये सतत वेगवेगळ्या कारणांवरून भांडणं होत असतं मंगळवारी सकाळी दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्याभरात त्याने तिच्या अंगावर कुर्हाडीने वार केले. त्यामध्ये ती महिला गंभीर जखमी होऊन मयत झाली.
या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी , रेवदंड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले , पोलीस उपनिरीक्षक नंदगावे व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. ठार मारण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीसांनी सांगितले. परंतू संशयावरून खून केल्याचा अंदाज प्राथमिक चर्चेतून असल्याचे सांगण्यात आले आहे.