बीएसएनएल नेटवर्क कोलमडले

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

रत्नागिरी शहरात पाणी योजनेचे काम करताना बीएसएनएलची केबल तुटल्यामुळे गेले दोन दिवस लांजा तालुक्यात बीएसएनएलचे नेटवर्क पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे बीएसएनएल धारकांची गैरसोय झाली. या संदर्भात बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी रत्नागिरी येथे बीएसएनएलची केबल तुटल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे बीएसएनएल नेटवर्क मिळत नाही. याबाबत तक्रारी आलेल्या आहेत. केबल जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लांजा तालुक्यात अनेक ग्राहक हे बीएसएनएल नेटवर्क वापरतात. ग्राहकांची संख्या मोठी आहे. गेले दोन दिवस बीएसएनएल ग्राहकांना नेट नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहेत. बीएसएनएल नेट असलेल्या काही शाळांमध्ये ऑनलाईन कामे प्रलंबित राहिली आहेत. ग्रामीण भागात ऑनलाइन कामे करणाऱ्यांना याचा फटका बसला आहे. लवकरच बीएसएनएल नेटवर्क सुरळीत होईल, असे बीएसएनएल अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version