। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताला वंदे भारत 2.0 हायड्रोजन ट्रेनची भेट दिली आहे. यासोबतच यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याची अर्थमंत्र्यांनी केली आहे. तसंच रेल्वेमध्ये 100 नवीन महत्त्वाच्या योजनांची लागू करणार आहेत.
नऊपट अधिक वाटप
रेल्वेवर आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च केला जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आतापर्यंतची ही सर्वाधिक तरतूद आहे. 2013-14 च्या तुलनेत हे नऊ पटीने जास्त वाटप करण्यात आले आहे.
या वर्षी, रेल्वेला देण्यात येणारा निधी नवीन टाकण्यासाठी, अर्ध-हाय-स्पीड वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी, हायड्रोजनवर चालणार्या गाड्या तसेच अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जाईल. 2022-23 मध्ये वृद्धांना भरघोस अनुदानासह प्रवाशांना दिल्या जाणार्या बहुतांश सवलती बंद केल्यानंतर रेल्वेने मोठ्या प्रमाणात बचत केली होती. तसंच मार्गांच्या विद्युतीकरणामुळेही बचत झाली होती. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 2022-23 आतापर्यंत 41,000 कोटी रुपयांचा अधिक महसूल कमावल्याचं रेल्वेने म्हटलं आहे. भारतीय रेल्वेला या आर्थिक वर्षात एकूण रु. 2,35,000 कोटी महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.