बजेट 2023 : श्रीअन्न योजनेला प्रोत्साहन

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

2023 हे भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, संयुक्त राष्ट्रांनी गेल्या वर्षी भारत सरकारच्या पुढाकाराने 2023 हे आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केले. या प्रस्तावाला इतर 72 देशांनी पाठिंबा दिला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुद्धा मिलेट्सचे महत्त्व अधोरेखित केले. सीतारमण यांनी सांगितले की, मिलेट्स म्हणजेच हे संपूर्ण पोषक आहार आहे. म्हणूनच याला भारतात ‘श्रीअन्न’ सुद्धा म्हंटले जाते.

श्रीअन्न म्हणजे काय
गहू-तांदूळ वगळता इतर ज्या धान्यांवरचं नैसर्गिक आवरण भरड करून काढल्यानंतर त्यांचा वापर आहारात करता येतो त्यांना भरडधान्य म्हणतात. पूर्वी उखळ-मुसळ वापरून या प्रकारच्या धान्यांवरील कवच किंवा साळ, साल काढली जात असे. त्यानंतर दगडी दळून त्या भरडीचं पीठ केलं जाई. काळाच्या ओघात उखळ-मुसळाच्या जागी पिठाच्या गिरण्या आल्या. शेती क्षेत्रात आधुनिक संशोधनं आणि वेगवेगळ्या पिकांची सुधारित वाणंही आली. यामुळेच मिलेट्स म्हणजेच भरडधान्य हा प्रकार थोडा मागे पडत गेला. ज्वारी, बाजरी, राळे, वरई, नाचणी, कोदो, राजगिरा, डेंगळी वगैरे तृणधान्यं भरडधान्यांच्या गटात मोडतात. गहू-तांदूळ ही तृणधान्यात घटक असल्याने त्यांचा समावेश भरडधान्यांत करत नाहीत. कोणत्याही भरडधान्यात ग्लुटेन हा घटक नसतो.

Exit mobile version