| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
महावितरणच्या तुटलेल्या केबलचा शॉक लागल्याने आंबिवली येथील शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.
बाळाराम शंकर पाटील हे आंबिवली येथे राहात असून, त्यांच्या शेतीच्या परिसरात एका विद्युत खांबावरील केबल तुटली होती. त्यांनी याबाबत महावितरणच्या वायरमनला चार ते पाच दिवसांपूर्वी कळवले होते. मात्र, कोणीही त्या ठिकाणी काम करण्यात आले नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. सहा सप्टेंबर रोजी सकाळी त्या तुटलेल्या केबलचा बैलाला स्पर्श झाल्याने यात बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. केबल तुटलेली असल्याने मनुष्यहानीदेखील होऊ शकते. वायरमनच्या बेपरवाईमुळे ही घटना घडली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी आणि वायरमनवर कारवाई व्हावी, अशी मागणी पाटील यांच्याकडून केली जात आहे.
शॉक लागून बैलाचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606