| पनवेल | वार्ताहर |
महावितरणच्या तुटलेल्या केबलचा शॉक लागल्याने आकुर्ली येथील रमेश म्हसकर यांच्या तीन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हसकर यांनी सकाळी आकुर्ली- चिपळे हद्दीत म्हशी चरण्यासाठी नेल्या होत्या. यावेळी महावितरणची केबल तुटलेली असल्याने तिचा शॉक लागून तीन म्हशी मृत्युमुखी पडल्या. म्हशींच्या मृत्यू प्रकरणी महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.