अलिबाग एसटी डेपो समोर उनाड बैलांची झुंज

अनेक वाहनांचे नुकसान

अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग शहरातील एसटी डेपोसमोर दोन मोकाट बैलांच्या झुंजी मध्ये अनेक वाहनांची नासधूस होवून नुकसान झाले आहे. सांयकाळच्या सुमारास ही घटना घडली. अलिबाग परिसरात मोठ्या संख्येने रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरे, घोडे यांच्यामुळे अनेक समस्या निर्माण झाली आहे. यावर शासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

Exit mobile version