चंद्रकांत धुमाळ यांची बैलगाडी प्रथम
| पनवेल | वार्ताहर |
पेझारी हौशी बैलगाडी मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य बैलगाडी शर्यत पेझारी मातीबंदर येथे भरवण्यात आल्या होत्या. ह्या स्पर्धेमध्ये 80 बैलगाड्यांनी भाग घेतला होता.
सदर स्पर्धेचे उद्घाटन महिला आघाडी प्रमुख (शे.का.प.) चित्रलेखा पाटील तसेच, मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या बैलगाडी शर्यतीच्या अंतिम गटामध्ये पेझारी दिवलांगचे गावचे चंद्रकांत शंकर धुमाळ यांची बैलगाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली, तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी नागझरी बांधणचे महेंद्र साळवी आणि तिसर्या क्रमांकाचे मानकरी कामार्ली वाघोलीचे ऋषिकेश नागांवकर ठरले. या बैलगाडी शर्यतीला हजारो प्रेक्षकांनी उपस्थित लाभली.