• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

राजा केणी समर्थकांची गुंडगिरी

Krushival by Krushival
October 9, 2024
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
527
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हेमंत खरसांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला


। अलिबाग । प्रतिनिधी ।

कुसूंबळेतील हेमंत खरसांबळे यांच्यावर मंगळवारी (दि.8) रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर हॉकी स्टीकने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. शिंदे गटातील राजा केणी यांच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याचा आरोप खरसांबळे यांनी केला आहे. ही घटना घडून 12 तास उलटले आहेत. मात्र अद्यापही मारेकरी मोकाट असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेने अलिबागमध्ये शिंदे गटातील कार्यकर्त्यांची गुंडगिरी वाढली आहे. ही गुंडगिरी रोखण्यास रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यशस्वी ठरतील का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

खरसांबळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजा केणी यांच्या समर्थकाचा संदीप पाटील यांच्यासोबत वाद झाला होता. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, वाद विकोपाला जाऊ नये, यासाठी खरसांबळे यांनी मध्यस्थीची भूमिका घेऊन वाद मिटवला. त्यानंतर ते पोयनाड पोलीस ठाण्यातून त्यांच्या कुसंबळे येथील घरी दुचाकीवरून निघाले. श्रीगावजवळ सदगुरू हॉलजवळ आल्यावर झाडांच्या फांद्या रस्त्यावर आडव्या टाकलेल्या होत्या. त्यावेळी खरसांबळे यांनी त्यांच्या गाडीचा वेग कमी केला. दरम्यान भुषण पाटील, संजय पाटील, चेतन वावेकर व इतर काही मंडळींनी हॉकी स्टीकचा जीवघेणा हल्ला खरसांबळे यांच्यावर केला. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली.

रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवतामध्ये ते बेशुध्द अवस्थेत पडले. तसेच त्यांच्या गाडीचेदेखील नुकसान झाल्याचे दिसून आले. त्याचवेळी त्यांच्या मागून त्यांचा भाचा संदीप त्यांच्या चारचाकी गाडीतून कुटूंबियांसमवेत येत असताना त्यांच्या गाडीवरही गाव गुडांनी हल्ला केला. त्यामध्ये चारचाकी गाडीचे नुकसान झाले. यावेळी त्यांच्या सोबत संदीप पाटील यांची आई, पत्नी व दहा वर्षाचा मुलगा गाडीत होता. सुदैवाने ते बचावले. याप्रकरणी पोयनाड पोलिसांना कळविण्यात आले. परंतु पोलिसांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप खरसांबळे यांनी केला आहे. रात्रीच्यावेळी झालेल्या हल्ल्याची साधी तक्रारही त्यांनी घेतली नाही. पोलिसांच्या या भुमिकेबाबत खरसांबळे यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. राजा केणीच्या सांगण्यावरून हा हल्ला केला केला असल्याचे ते म्हणाले. या गुंडगिरीमुळे परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.

कर्तव्यावर असणाऱ्या  पोलिसांची बघ्याची भुमिका
हेमंत खरसांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी पोयनाड पोलीसांशी संपर्क साधून माहिती दिली. तरीदेखील त्याठिकाणी तात्काळ पोलिस पाठविले नाही. पोलिस ठाण्यात गेल्यावर माहिती देऊनही मारेकर्‍यांविरोधात गुन्हा दाखल केला नाही. कर्तव्यावर असणार्‍या पोलिसांनी बघ्याची भुमिका घेतल्याचा आरोप खरसांबळे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
राजा केणीने मारण्याचा प्लॅन पोलीस ठाण्यातूनच केला?
शिंदे गटातील सदस्यासोबत झालेले भांडण खरसांबळे यांच्या मध्यस्थीने पोलीस ठाण्यात मिटविण्यात आले. त्यावेळी राजा केणी त्याच ठिकाणी होते. प्राणघातक हल्ला बारा वाजण्याच्या सुमारास झाल्यावर खरसांबळे यांचे कुटूंबिय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी राजा केणीदेखील पोलीस ठाण्यामध्येच होते. त्यामुळे त्यांनीच हा प्लॅन आखला असल्याचा आरोप खरसांबळे यांनी केला आहे.

Related

Tags: alibag newscrime newsfatal attackhemant kharsambalekrushival mobile appkusumblemaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoyanad policeraigadraja kenisocial media newssocial news
Previous Post

ट्रक चालक-मालक संघटनेचे आंदोलन

Next Post

मोकाट जनावरांमुळे भातशेती धोक्यात

Krushival

Krushival

Related Posts

विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट
कर्जत

विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

नगदी पिकांचे मोठे नुकसान

March 7, 2026
माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार
कर्जत

माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार

March 7, 2026
आदिवासी बांधवांना मिळणार पक्की घरे
sliderhome

आदिवासी बांधवांना मिळणार पक्की घरे

March 7, 2026
नेरळ ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार उघडकीस
कर्जत

नेरळ ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार उघडकीस

March 7, 2026
पालिकेची सुरक्षा ‌‘ती‌’च्या हाती
sliderhome

पालिकेची सुरक्षा ‌‘ती‌’च्या हाती

March 7, 2026
Next Post
मोकाट जनावरांमुळे भातशेती धोक्यात

मोकाट जनावरांमुळे भातशेती धोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?