बुमराहची भेदक गोलंदाजी; भारताला विजयासाठी 273 धावांचे आव्हान

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था।

जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला 50 षटकात 272 धावांवर रोखले. अफगाणिस्तानकडून कर्णधार शाहीदी याने झुंजार 80 धावांची खेळी केली. तर उमरजाई याने 62 धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानच्या 4 फलंदाजांना तंबूत धाडले तर हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. सपाट खेळपट्टीवर भारताला विजयासाठी 273 धावांचे आव्हान आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमारह याने पॉवरप्ले आणि अखेरच्या षटकात भेदक मारा केला. जसप्रीत बुमराहने आपल्या 10 षटकांमध्ये फक्त 39 धावा खर्च केल्या. बुमराहने अफगाणिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. शार्दूल ठाकूर याने 6 षटकांमध्ये 31 धावा खर्च करत एक विकेट घेतली. तर, हार्दिक पांड्याने 7 षटकांत 43 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज महागडा ठरला. सिराजला 9 षटकांमध्ये 70 पेक्षा जास्त धावा कुटल्या.

Exit mobile version